Monday, September 24, 2007

20-20 world cup: India Rocks!


Final: India vs Pakistan!

What a fantastic match it was! India knocks out pakistan by 5 runs and bag the 20-20 worldcup. Truly it was real team effort shown by India. The thrill continued till the last ball.

चोवीस वर्षांपूर्वी भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडीजला नमवीत १९८३ची विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा जिंकली. त्या वेळी कर्णधार कपिलदेवने व्हीव रिचर्डसचा सुरेख झेल घेत सामन्याला निर्णायक कलाटणी दिली. त्यानेच ऐतिहासिक लॉर्डसवर विश्‍वकरंडक उंचावून भारताच्या जागतिक क्रिकेटमधील वर्चस्वावर शिक्कामोर्तब केले.

चोवीस वर्षांनंतर ट्‌वेंटी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेद्वारे प्रथमच भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. धोनीच्या कुशल नेतृत्वाबरोबरच भारतीय खेळाडूंच्या सांघिक कामगिरीच्या बळावर भारताने ही स्पर्धा जिंकली. महेंद्रसिंह धोनीने ट्‌वेंटी-२० विश्‍वकरंडक उंचावला आणि एकदम १९८३चाच क्षण पुन्हा एकदा डोळ्यांसमोर तराळला.
:Source eSakal


No comments: